शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

भाजपासाठी अमित शाहांचे मिशन 350+,  सुरू केली 2019 च्या निवडणुकीची तयारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2017 20:34 IST

देशभरात भाजपाचा पाया विस्तारल्यानंतर  भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी 2019च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमित शाह यांनी यासंदर्भात आज बैठक आयोजित केली होती, या बैठकीत 2014 च्या निवडणुकीमध्ये ज्या जागांवर पराभव झाला. त्याठिकाणी अधिक मेहनत घ्यावी लागेल, असे मंत्री आणि पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आले.

नवी दिल्ली, दि. 17 - देशभरात भाजपाचा पाया विस्तारल्यानंतर  भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी 2019च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमित शाह यांनी यासंदर्भात आज बैठक आयोजित केली होती, या बैठकीत 2014 च्या निवडणुकीमध्ये ज्या जागांवर पराभव झाला. त्याठिकाणी अधिक मेहनत घ्यावी लागेल, असे मंत्री आणि पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आले. तसेच 2019 च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये 350 हून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य भाजपाने समोर ठेवले आहे.  आज झालेल्या बैठकीमध्ये ज्या ठिकाणी भाजपाला पराभव पत्करावा लागला होता. अशा मतदारसंघांसदर्भातील एका प्रेझेंटेशनही आजच्या बैठकीत सादर करण्यात आले. तसेच येत्या दोन वर्षांमध्ये या मतदारसंघांमध्ये नेत्यांनी मेहनत घेतली पाहिजे, असे अमित शाह यांनी नेत्यांना सांगितले. या प्रेझेंटेशनमध्ये पश्चिम बंगाल, ओदिशा, तेलंगाणा, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकमधील जागांचा उल्लेख करण्यात आला आहे, अशी माहिती अंतर्गत सूत्रांनी दिली आहे.  गेल्या काही काळापासून सातत्याने पक्षविस्तारासाठी प्रयत्नशील असलेले अमित शाह या राज्यांमधील भाजपाची कामगिरी सुधारू  इच्छित आहेत. त्यामुळे या राज्यांमधील मतदार संघांवर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार आज झालेल्या बैठकीमध्ये कुठलेविषय प्राधान्य क्रमावर असतील, याबाबत गुप्तता पाळण्यात आली होती. त्यामुळे मंत्री आणि पदाधिकाऱ्यांना बैठकीत सहभागी होईपर्यंत या बैठकीत 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीची चर्चा होईल, याबाबत कल्पना नव्हती. तसेच बैठक संपल्यानंतरही यापैकी कुणीही प्रसारमाध्यांशी चर्चा केली नाही.  भाजपा मुख्यालयात झालेल्या या बैठकीमध्ये भाजपाचे अनेक मंत्री सहभागी झाले होते. त्यांच्यामध्ये प्रकाश जावडेकर, जेपी नड्डा, अनंत कुमार, रविशंकर प्रसाद, नरेंद्र सिंह तोमर, धर्मेंद्र प्रधान, पीयूष गोयल, निर्मला सीतारमण, अर्जुन मेघवाल आणि मनोज सिन्हा यांचा समावेश होता. यावेळी अमित शाहा यांनी सर्व मंत्र्यांकडून त्यांच्या मंत्रालयाच्या योजनांचा प्रत्यक्षात झालेला परिणाम जाणून घेतला. तसेच पक्षसंघटनेशी संबंधित नेत्यांकडून पक्षाबाबत जनमानसात असलेल्या वातावरणाचीही माहिती घेतली. या बैठकीत पक्षसंघटनेशी निगडीत कैलाश विजयवर्गीय, राम माधव, अनिल जैन, मुरलीधर राव आणि अरुण सिंह हे सहभागी झाले होते. अमित शाह पक्षाच्या संभाव्य कामगिरीचा कानोसा घेण्यासाठी दर चार महिन्यांनी सर्व्हे करवून घेत आहेत.  2014 साली झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाने 284 जागा जिंकल्या होत्या.  मात्र सद्यस्थितीत अत्यंत कमकुवत आणि विस्कळीत झालेला  विरोधी पक्ष पाहता 2019 साली आरामात 350 हून अधिक जागा जिंकता येतील असा शाहा यांचा अंदाज आहे. 

टॅग्स :Amit Shahअमित शाह